Ad will apear here
Next
माझी बोली असे मराठी



मराठी बोली अन् भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे सांगणारी ‘माझी बोली असे मराठी’ ही मा. रा. पोतदार यांची कविता आज पाहू या...

..........

माझी बोली असे मराठी

जी शिवबाच्या फुलली ओठीं

ज्ञानेशाला त्या तुकयाला               

नाचविले नित भक्तीसाठी 

माझी बोली असे मराठी

झुंज झुंजली सत्यासाठी 

परचक्राच्या घोर संकटी

अन्यायाची फोडून छाती


माझी बोली असे मराठी

जिने सोसले प्रहार पाठीं

पचवुन हलाहल; अमृत ओठीं

तीच असे मम माय मराठी


माझी बोली असे मराठी

जिने शिकविला स्वाभिमानही 

ज्या बोलीस्तव रणांत मेले

शूर-वीर ते लाखो गणती


माझी बोली असे मराठी

उभी राहिली संतांपाठी                  

शूरांची, नरवीरांची जी

फुलवित, उजळित छाती छाती

माझी बोली असे मराठी

जीस्तव झिजले कविवर शाहिर

भाष्यकार ते निबंधकार

नाटककर्ते किती मातब्बर

माझी बोली असे मराठी

प्राणाहुन ती प्रियतम मजला

महाराष्ट्राची पवित्र भूमी

करिते मंगल वेळोवेळी

असोत बोली कितीक सुंदर

परि श्रेष्ठचि मज माय मराठी

अभंग उज्ज्वल ही मम बोली

देह जळो हा तिचियासाठी

- मा. रा. पोतदार

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZPKCJ
Similar Posts
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी भक्तीपासून शौर्यापर्यंत मराठी कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे सांगणारी रा. अ. काळेले यांची ‘नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी’ ही कविता आज पाहू या.
जैसी हरळांमाजी रत्नकिळा... ‘मराठी भाषा म्हणजे जणू कस्तुरी आणि कल्पतरूच,’ असं म्हणणारी फादर ख्रिस्तदास थॉमस स्टीफन्स यांची कविता आज पाहू या...
मराठीची लिपी मराठीची लिपी म्हणून, बोली म्हणून असलेली वैशिष्ट्यं सांगणारी ‘आमुची लिपी’ ही कविता आज पाहू या. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी ती लिहिली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language